मंठा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल
मंठा(सुभाष वायाळ )शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंठा नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सौ. मीरा बालासाहेब बोराडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस यु शिंदे आणि कार्यालयीन अधीक्षक सुधाकर खैरे यांनी नगराध्यक्षपदाचे नामनिर्देशन पत्र स्वीकारले. यावेळी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्यासह ज्येष्ठ नेते अंकुशराव अवचार, माजी सभापती संतोष वरकड, प्रल्हादराव बोराडे, तालुकाप्रमुख अजय अवचार, माजी सभापती सुरेशराव सरोदे, श्रीरंगअण्णा खरात, डॉ. ए डी बोराडे, अरुण प्रधान, यांच्यासह नगरसेवक अचितराव बोराडे, बालासाहेब बोराडे, नितीन राठोड, प्रदीप बोराडे, दिपक बोराडे, अरुण वाघमारे, जे के कुरेशी, सचिन बोराडे, वैजनाथ बोराडे, बाज खान पठाण, शेख साजिद शेख जलील, उबेद भाईजी बागवान, विकास सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने सौ. मीरा बालासाहेब बोराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख दिगंबर बोराडे, तुळशीराम कोहिरे, गजानन बोराडे, पप्पू दायमा, तोफिक कुरेशी, गंगाराम गवळी, अशोक अवचार, नितीन मोरे, इम्रान पठाण, किरण सूर्यवंशी, मारुती खनपटे यांची उपस्थिती होती.