तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. राठोड यांची तळणी मंडळात भेट

 तळणी दि.13(रवी पाटील)तालुका कृषी अधिकारी यांची तळणी मंडळात क्षेत्र भेट झाली दरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री  व्हीे जे राठोड यांनी मंडळा अंतर्गत मौजे तळणी येथे राबविण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उन्हाळी सोयाबीन , राअसूअ अंतर्गत प्रकल्प भेट , कामगंध सापळे कार्यक्षमता चाचणी क्षेत्र भेट , रब्बी उन्हाळी पीक पाहणी क्षेत्र  भेटी केल्या. 
           दरम्यान प्रकल्पातील जवारी फुले रेवती चे वान चांगले येण्याचे संकेत आढळून आले असून येत्या हंगामात नवीन जवरी बियाणे फुले संगम सारखे प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

           दरम्यान  भाजीपाला बीजोत्पादन नर्सरी उत्पादक शेतकरी श्री अरुण आप्पा सरकटे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून टोमॅटो, मिरची, टरबूज,  कांदा इत्यादी बीजोत्पादन कार्यक्रमाची दखल घेतली या सर्व बीजोत्पादन चे माध्यमातून त्यांना प्रती शेडनेट 250000 रुपयाच्या लाभ अपेक्षित असून असे तीन शेडनेट आहेत, सोबत टरबूज पिकाचे २ एकर क्षेत्र असून 8 ते१० लाख रुपयाचे बीजोत्पादन  अपेक्षित आहे. सोबत च कांदा पीक  बीजोत्पादन चे क्षेत्र ३ एकर असून अंदाजे १० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. एकूण त्यांना 20 लाखाचे उत्पन्न अपेक्षित असून त्यांची कृषी निष्ट पुरस्कार करिता शिफारस  झाली आहे. ते आपल्या यशाचे श्रेय जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक तळणी  यांना देतात .  शेतकऱ्यांनी विविध डीबिटी आणि पोकरा योजना अंतर्गत योजनांचा लाभ घेवून आपले उत्पन्न वाढवावे आणि बीजोत्पादन कार्यक्रमा कडे वळून कमी क्षेत्रात , कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही योजना अंतर्गत शेडनेट करिता अनुक्रमे शासन मार्गदर्शक सूचना चे अधीन राहून अनुक्रमे 50 ते 70 % पर्यंत अनुदान मिळते. सदर भेटी दरम्यान  , कृषी सहायक विजय खोडके, राजू इधोले,कृषी पर्यवेक्षक माऊली नाईक नवरे ,  सिदार्ध खाडे, मंडळ अधिकारी पवार इत्यादी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....