गुरु गंगाभारती महाराज पुण्यतिथी निमित्त व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन, हरी कीर्तनासाठी उपस्थित राहण्याचे युवा मोर्चा जिल्हा महामंत्री संपत टकले यांचे आवहान
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
गुरु गंगाभारती महाराज पुण्यतिथी व माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दैठणा खुर्द फाट्यावरील गुरु गंगाभारती संस्थान प्रांगणामध्ये ह भ प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे सायंकाळी 5:00वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कीर्तनाचे संयोजक युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तथा दैठणा खुर्द चे उपसरपंच संपत पाटील टकले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या गुरु गंगाभारती महाराज यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त व राज्याच्या राजकारणामध्ये आपला ठसा उमटवत पाणी पुरवठा खात्याचा भार सांभाळताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारसंघासह राज्यामध्ये अनेक विकासात्मक कामे केली आहेत या पार्श्वभूमीवर हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले असून या हरी कीर्तनासाठी पंचक्रोशी सह मतदारसंघातील जनतेने श्रवण करण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक संपत पाटील टकले यांनी केले आहे
ह भ प निवृत्ती महाराज देशमुख यांनी राज्यभरात युवकांसाठी समाज प्रबोधन केले असून या प्रबोधनाचा लाभ मतदारसंघातील जनतेला व्हावा यासाठी या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे या पत्रकात शेवटी नमूद करण्यात आले आहे