सपोनि गोरखनाथ शेळके यांना पोलीस निरीक्षक पद्दी बडती
परतूर / प्रतिनिधी हनुमंत दवंडे
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरखनाथ शेळके यांची नुकतीच बढती मिळाली आहे. सपोनि पदावरून पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे.
मूळगाव बीडचे रहिवाशी असलेले गोरखनाथ शेळके हे १९८७ साली पोलिस म्हणून नौकरीत रुजू झाले होते. पोलिस खात्यात त्यांचे २००६ साली पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रमोशन झाले. त्या नंतर अहमदनगर येथे कर्तव्य बजावले. आठ वर्षा नंतर २०१४ साली सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून नाशिक, औरंगाबाद ग्रामीण, जालना येथे कामकाज हाताळले. परतूर येथे सपोनि धुरा सांभाळत असतांना दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी सपोनि पदावरून पोलिस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली. पोलिस निरीक्षक म्हणून पोलिस प्रशिक्षण केंद्र जालना येथे रुजू होणार आहेत. पोलिस निरीक्षक शेळके यांची शांत व संयमी शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पदोन्नती मिळाल्या बद्दल पोलिस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी आर डी. मोरे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.