मनुष्याच्या आयुष्यातील सोई हे सगळे अनिश्चीत आहे-ह. भ. प. उमेश दशरथे महाराज
तळणी /प्रतिनिधी रवी पाटील ( वाघाळा ) संताचे जीवन हे पूण्यवान असते म्हणून त्याचे पूण्यस्मरण मोठ्या उत्साहाने साजरे होत असते आज काल स्वःतच्या बापाची श्राद्धाची तीथी विसरणारे युग आहे बापाचे उपकार विसरणारे युग आहे मनुष्याच्या आयुष्यातील सोई हे सगळे अनिश्चीत आहे स्वःत जगणे मरणे हे सुध्दा अनिश्चित आहे तरी सुद्धा मनुष्य संसारीक विषयांत इतका गुरफटला आहे की स्वःत च्या कर्तृत्वावर सुद्धा त्याचा विश्वास राहीला नाही आज काल आई वडीलांना किमत न देणे म्हणजेच त्याना लाथा मारण्याच्या बरोबरी चे असल्याचे प्रतिपादण ह भ प उमेश महाराज दाशरथे यानी प्रेममूर्ती किसन महाराज वाघाळेकर यांच्या तपपूर्ती सोहळयाच्या निमित्य वाघाळा येथे काल्याच्या प्रंसगी केले जगदगूरू तुकाराम महाराज यांच्या बहु बरा बहु बरा यां सांगाते मिळे चारा म्हणोनी जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी
या अभगावर सुदर निरुपण केले काला म्हणजे प्रसाद आहे अनेक पंरपरे मध्ये काल्याला अनन्य साधारण महत्व आहे वारकरी सांप्रदायामध्ये प्रसादालाच काला म्हणण्याची प्रथा आहे तोच काला तुम्हा आम्हाचा उध्दार केल्याशिवाय राहणार नाही गरज आहे तो शुद्ध मनाने स्वीकारायची काला म्हणजे प्रसन्नता काल्याच्या किर्तनादीवशी सगळीकडे प्रसन्नता असते सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी हे सुध्दा काल्याने प्रसन्न होत असतात कारण काला हे देवाने प्रसादरूपी आपल्यासाठी दीलेला .आहे भूतलावरील काला हा सहजा सहजी मिळत नाही
संसांर करून जे मिळते त्याला पश्चाताप म्हणतात आणि परमार्थ करून जे मिळते त्याला प्रसाद म्हणतात परमार्थ रुपी प्रसाद मनुष्याला सहजा सहजी मिळत नाही कारण प्रसाद मिळवण्याकरिता तुम्हा आम्हाला परमार्थात यावे लागेल ही पहीली पायरी आला तर तो टीकला पाहीजे ही दुसरी पायरी आणि आला आणि टीकला याला तीसरी पायरी या सगळ्या गोष्टीत जो टीकला त्यालाच प्रसाद मिळतो सध्या परमार्थात येणे खूप अवघड झाले आहे आणि तो आला आणि टीकला तर तो प्रसादापर्यन्त जाईलच याची शाश्वती नाही या सर्व गोष्टीला गीतेचा आधार आहे परमार्थ प्राप्ती साठी एखाद्याला सिध्द व्हावे लागते जेवढे जन्माला आले तेवढे परमार्थात आहेतच असे नाही जे आहेत ते टीकले नाही जेवढे टीकले तेवढयाना काला प्राप्त होईल असे नाही मनुष्याला सांसारीक आयुष्यात सुख समाधान फारच कमी आहे त्याला जर ते प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याला भक्ती मार्गाची वाट धरावी लागेलच संसारीक वाटेवर अनेक अडचणी आहेत पंरतू भक्ती मार्ग हा सरळ आहे तोच मार्ग भगवंता प्रिय असतो संसारीक आयुष्याला मनुष्य कंटाळला असला तरी तो काला झाल्यावर त्याच वाटेने जातो तो मोह त्याला सुटत नाही परमार्थ येवढा गोड असताना सुध्दा त्यामध्ये प्रवृत्ती नाही परमार्थात प्रवृती व्हायला फार मोठी किमंत मोजावी लागते संसाराचा त्याग त्यासाठी करावा लागतो तो त्याग फक्त संतच करू शकतात त्यागाचा आदर्श म्हणजेच ज्ञानोबा तुकोबा आहे त्यानी दाखवलेला भक्ती मार्गच मनुष्य जीवनाचा उध्दार केल्याशिवाय राहणार नाही
कृष्ण चरित्र हे त्यागाचे चरित्र आहे आज खरी गरज ही कृष्णनीती स्वीकारण्याची आहे धर्म टीकवण्यासाठी कृष्ण निती वापरावीच लागेल या काल्याच्या प्रसंगी कृष्ण चरित्रावर प्रकाश टाकला
प्रेममूर्ती किसन बाबा वाघाळेकर यांच्या तपपूर्तीपूण्य स्मरणानिमित या सप्ताहचे आयोजन ज्ञानेश्वर माऊली वाघाळेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होत श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील विद्यार्थानी सात दीवस साथ संगत केली तसेच सोपान महाराज पेवेकर शालीकराम टेकाळे विष्णु महाराज बादाड जनार्धन स्वामी सरकटे ग्रामस्थ व भक्त परीवाराने मोठे परीश्रम घेतले