प्रा. नवले यांची भारतीय संग्राम परिषदेच्या जालना जिल्हा निरीक्षक पदी निवड
शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिवसंग्रामच्या सोमवार दिनांक २४ जानेवारी २०२२ च्या राज्यस्तरीय बैठकी मध्ये येणान्या काळातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरच्या निर्णयास अनुसरून भारतीय संग्राम परिषद ज्या जिल्ह्यात निवडणूक लढवणार आहे अशा जिल्ह्यांवर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत जालना या जिल्ह्याकरिता भारतीय संग्राम परिषद या पक्षाच्या वतीने जिल्हा निरीक्षक म्हणून प्रा. लक्ष्मण नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नुकतेच त्यांना आ. विनायकराव मेटे यांच्या हस्ते मुंबई येथे नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जालना या जिल्ह्यातील निवडणुकीची पूर्व तयारी, शिवसंग्राम संघटनेची बांधणी, मतदार संघ व इच्छुक उमेदवारांची चाचपणी, जिल्ह्यात शिवसंग्राम संघटनेची सद्यस्थिती या अनुषंगाने स्थानिक जिल्हाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत बैठका घेणे, चर्चा करणे, उमेदवार निवड, नियुक्त्या वगैरे संबंधी निर्णय घेणे, व सदरच्या निवडणुकीत भारतीय. संग्राम परिषदेच्या उमेदवारांना निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे . याकरिता त्यांना पुढील वाटचालीस परतूर शिवसंग्राम तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसंग्राम पदाधिकारी उपस्थित होते.