हातडी येथील शिवाजी विद्यालयात कोविड लसीकरण संपन्न
परतूर /प्रतिनिधी हनुमंत दवंडे
तालुक्यातील हातडी येथील शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांचे दुसर्या डोससाठी लसीकरण शिबीर विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य विभागाकडून १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण शाळा स्तरावर राबविले जात आहे. यासाठी शिवाजी विद्यालयाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी पहिला आणि दूसरा डोस देण्यासाठी लसीकरण शिबीर घेऊन विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेतले. दि. ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दुसर्या लसीकरणात एकूण ८० विद्यार्थ्यांचे लसीकरण केले आहे. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी. मस्के, शिक्षक रविशचंद्र डोंगरे, दिगंबर खेत्रे, शाम हातकडके, शेख समी, भगवान राठोड, विजय बाहेकर, कैलाश शिंदे, सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,पोलिस पाटील, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर उपस्थित होत्या.