छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंठा येथे मनसे यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 51जणांनी केले रक्तदान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी तिथीनुसार येणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करा असे आवाहन केले होते
तिथीनुसार शिवजयंती चे औचित्य साधून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली
मनसे मंठा तालुकाध्यक्ष अध्यक्ष गणेश बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मंठा येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले, या शिबीराला मंठा तालुक्यातील नागरिकांनी व महिला भगिनींनी असे एकूण 51 जनांनी रक्तदान केले. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.