प्रहार संघटनेकडून महाशिवरात्री निमित्त फळे वाटप
_______________________
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या वतीने परतूर येथील हेमांड पंथी मंदिर इसवी .सन 16/ 24 चे पुरातन महादेव मंदिर व ग्रामीण रुग्णालय परतुर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आत्माराम जगताप यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आली .
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सिद्दिकी साहेब प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बप्पा सवणे तसेच जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना अशोक तनपुरे व हनुमान माने माजी जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग संघटना व प्रहार सेवक शंकर लिंगसे ,रमेश सुरवसे ,प्रकाश तनपुरे ,पत्रकार आढाव ,व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांना फळे वाटप करण्यात आली व सर्वांनी फळाचा आनंद घेतला.