प्रत्येक मुलींना आत्मस्वरक्षणासाठी कराटे ची गरज - उपविभागिय अधिकारी जाधव.
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
अलीकडे वाढत चालेली समाज व्यवसतेची विकृती पाहता महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणे अलीकडे वाढत चाललेली आहेत, या साठी प्रत्येक मुलींना आत्मस्वरक्षणासाठी कराटे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांनी केले. आखाडा बाळापूर, किनवट येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत येथील सोतोकान कराटे पटूंनी उपविजेता पद व विविध पदके जिंकल्या बद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
25/03/2022 रोजी येथील जिल्हा परीषद प्रशाळा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हनुन उपविभागीय आधिकारी.भाऊसाहेब जाधव यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक, शामसुंदर कौठाळे,डॉ. तापडीया, विष्णू वाघमारे,पत्रकार, अजय देसाई, राजेंद्र मुंदडा , आषिश गारकर, सोतोकानचे प्रशिक्षक माणिक जैस्वाल, रोहित जैस्वाल यांची उपस्तीती होती। यावेळी आपल्या मार्गदरपर मनोगतात जाधव पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक मुलींनी आपल्या बचाव करीता सेल्फ डिफेन्स जरूरी आहे. याकरिता मैदानी खेळ खेळत रहावे. यामुळे शरीर तर निरोगी राहते शिवाय आत्मबल वाढण्यासाठी कराटे सारखे प्रशिक्षण मोलाचे असल्याचे ते म्हणाले . या वेळी सोतोकान कराटे विध्यार्थ्यांनी आपले प्रत्याक्षीक दाखवत उपस्तिताचे मन जींकली. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या कराटे पटूंना सन्मान पदक, मेडल देत गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय देसाई यांनी तर आभार रोहित जैस्वाल यांनी मानले . यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्तीती होती.