वन्य प्राणी व मोकाट जनावरांनी दोन हेक्टर क्षेत्रावर पेरलेला हरबरा खाऊन केला फस्त..,शेतकऱ्याचे दिड ते दोन लाखांचे नुकसान...
मंठा प्रतिनिधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कैलास रामराव सरकटे यांची साडेतीन एकर
व विष्णु रंगराव सरकटे यांची अडीच एकर जमीन आहे.
कालच्या रात्री दि.2 मार्च रोजी नेमका काढणीला आलेला हरबरा या वन्य प्राण्यांनी खाऊन फस्त केल्याने रात्रंदिवस मशागत व खत पाणी घालुन जोरदार पिकविलेला हाता- तोंडाशी आलेला हरबरा फस्त झाल्याने शेतकरी कासाविस होऊन या शेतकऱ्याचे जवळपास दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
तरी तालुक्यातील वन विभाग,महसुल विभाग तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे...
तळणी परीसातील विदर्भाच्या सिमेलगत मोठे वनिकरण असुन या व निकरणातील झाडी मध्ये रान गाई रोही रानडूक्कर निलगाई माकड यांचा व अन्यप्राण्याच्या ञासा सोबतच गावातील शंभर मोकाट जनावरांचा ञास गावखोरच्या शेतकर्याना होत असुन याचा बदोबंस्त होणे गरजेचे असलेच्या प्रतिक्रीया अनेक शेतकर्यानी व्यक्त केल्या
पोर्टल बंदच संबंधीत शेतकर्यानी नुकसानीची तक्रार म्हणून वन विभागाच्या अधिकार्याकडे तक्रार केली असता त्याना ऑनलाईन तक्रार करण्याची माहीती वन विभागाच्या अधिकार्याकडून दीली गेली पंरतू . ते पोर्टलच बंद असल्याने तक्रार करावी कोणाकडे असा प्रश्न शेतकर्याना पडला आहे
सपूर्ण मंठा तालूक्यातून बऱ्याच शेतकर्याच्या तक्रारी आहेत शेती मालाचा वान बघून त्याची नुकसान भरपाई दीले जाते शासन निर्णयानुसार कितीही नुकसान झाले तरी एक हजाराच्या वर नुकसान भरपाई देता येत नसल्याचे ता वन विभाग अधिकारी ऐ पी अटकल यांनी सांगीतले तसेच ऑनलाईन तक्रारीस काही अडचण असल्यास ऑफीस मध्ये येऊन तक्रार नोदवली जाईल
एकीकडे अतीवृष्टी तर कधी दुष्काळी, अस्मानी व सुलतानी संकट तसेच
विजेची हुलकावणी व घर सोडून रात्रंदिवस वन्य प्राण्यांचा सांभाळ करूनही हाता तोंडातशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्याचे आर्थीक नुकसान होत असून अशा संकटामुळे
शेतकरी हतबल होत असुन वन विभाग याकडे सात्यत्याने दुर्लक्ष करीत आहे शेत पीकांचे नुकसान झाल्यावर ना कृषी अधिकारी याकडे लक्ष देतात ना वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.*
*केवळ तालुक्याच्या ठिकाणावरून वनविभागाचे कर्मचारी कित्येक वेळा नुकसान झाल्याच्या तक्रारी करून सुध्दा ना पंचनामा होतो ना शेतकर्याना ना मदत मिळते वनविभागाचे अधिकारी तालूक्याच्या ठिकाणावरून कारभार सांभाळत असल्याचे मत शेतकरी कैलास सरकटे यानी व्यक्त केले ..*