परतूर नगर परिषद कडून परतूर दिव्यांग अर्थसाह्य वाटप
..................
परतूर,ता.29 प्रतिनिधी हनुमंत दवंडे
नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद अर्थसंकल्पातील एकुण उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येते. त्यानुषंगाने नगर परिषद परतूरने दिव्यांग नागरीकांसाठी .सन 2021-22 या आर्थिक वर्षात 2,45,000/- (दोन लक्ष पंचेचाळीस हजार रुपये केवळ) ची तरतुद केली आहे. परतूर नगर परिषद कार्यालयातील सभागृहामध्ये मंगळवारी ता.29 रोजी दिव्यांग बांधवांना अर्थसहाय देण्यासाठी बोलावण्यात आले होते. परतूर नगर परिषद हद्दीत एकूण दिव्यांग लाभधारकांची संख्या 140 असून असून त्यापैकी जवळपास 30 ते 35 दिव्यांग बंधु-भगिनी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व माननीय मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सहा दिव्यांगांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. उर्वरित दिव्यांगाचे धनादेश आरटीजीएस करून थेट लाभधारकांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. याप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद परतुर परतुर यांनी दिव्यांग नागरिकांशी मुक्त संवाद साधला व त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. याप्रसंगी माननीय मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी साहेब यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रत्येक दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीन असे सांगीतले.
याप्रसंगी मा. उपविभागीय अधिकारी श्री भाऊसाहेब जाधव यांचे स्वागत मा. मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांनी केले. तसेच मा. मुख्याधिकारी यांचे स्वागत या कार्यालयाचे कर अधिक्षक श्री चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री एन. आर. दायमा व रामचंद्र पानवाले यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमास कार्यालयातील कर्मचारी अक्षय पोतदार, आय. एम. शेख, के. टी. सावंत, रवी देशपांडे, संतोष सोनवणे, मुकेश खरात, हरिभाऊ काळे, योगेश काटकर, अनिल पारिख, प्रकाश हिवाळे, शिवाजी गुंजमूर्ती, काळे बाई, राजू बागल, महादेव साबळे, विठ्ठल खंडागळे, फिरोज शेख, दीपक मोरे, महादेव खाटीकमारे इत्यादी कर्मचारी उपस्थित.