रामनगर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी जोशी गटाने केलेल्या गोळीबारात विजय ढेंगळे गंभीर जखमी...
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
जालना तालुक्यातील रामनगर येथे राजकीय पूर्ववैमनस्यातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार झाला आहे .रामनगर येथील शेजुळ गट व जोशी या दोन गटांमध्ये सकाळी 11 वाजता तुंबळ हाणामारी झाली काही शुल्लक कारणावरून यांच्यात वाद झाला असून या मारामारी मध्ये जोशी गटाने गोळीबार केल्यामुळे प्रकरणाला मोठे स्वरूप प्राप्त झाले .जालना व परतूर येथून पोलीस मागवण्यात आले होते आरसीपी पोलीस दलाने सुद्धा आपली भूमिका निभावली आहे यावेळी जालना जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली त्यांनी घटनास्थळाचा सदरील पंचनामा करून शांतता राखण्याची विनंती केली होती .यावेळी जोशी गटातील सर्वांना पोलिस व्हॅनमध्ये टाकून मंठा येथे हलवण्यात आले पुढील कारवाई करण्यात आली या प्रकरणात विजय ढेंगळे यांच्या पोटात गोळी लागल्यामुळे उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. परतूरचे उपपोलीस अधीक्षक राजू मोरे यांनी जनतेल शांतता राखण्याचे आव्हान केले आहे .