जि.प.प्रा.शा.वसंतनगर तळणी येथे शाळा पूर्वतयारी अभियान केंद्रस्तरीय प्रशिक्षण व शाळा स्तरीय मेळावा पार पडले.
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
केंद्रस्तरीय प्रशिक्षण व शाळा स्तरीय मेळावा यांच्या आतर्गत तळणी येथे
सुरुवातीला प्रभातफेरी काढण्यात आली.आगामी जुन 2022 या वर्षात शाळेत प्रवेशीत बालकांचे व माता पालकांचे अगदी उत्साहात स्वागत करण्यात आले. मेळाव्याची सुरुवातीला सांस्कृतीक गीते सादर करण्यात आली.त्यानंतर मेळाव्यात विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते.जसे शारीरिक ,बौद्धिक,सामाजिक व भावनिक , भाषा विकास ,गणनपूर्व तयारी असे एकूण 8 प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले. या प्रत्येक स्टॉल वर बालकाची प्रगती तपासण्यात आली. बालक ज्या ज्या गोष्टीत कमी असेल तेथे त्या गोष्टीत परिपूर्ण होण्यासाठी त्या बालकाच्या माता पालकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी तळणी केंद्राचे गटसमन्वयक - श्री अभिमान बायस सर , तळणी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक - श्री जे.डी. इंगळे सर , श्री ए.टी.धारतकर सर तसेच तळणी केंद्रातील सर्व शाळेतील 50% शिक्षक उपस्थित होते.
प्रशिक्षण तज्ञ म्हणून - श्री राजबिंडे सर व पी.डी.उमाळे यांनी मोलाची भूमिका बजावली. या शाळापूर्व तयारी मेळावा यासाठी अंगणवाडी ताई व सेविका, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य श्रीमती मनोरमा सदर, विद्या पवार, रोहीणी भावसार, अनीता पांचाळ, कल्पना देशमुख. जयश्री वाघ यांनी स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहशिक्षिका श्रीमती कुलकर्णी व्ही.बी.यांनी मोलाची भूमिका बजावली.
..