विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव देऊन स्पर्धेत टिकणारी पिढी घडवा- राहुल लोणीकर*
परतुर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे
स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर पुस्तकी ज्ञाना सोबतच विद्यार्थ्यातील कलागुणांना वाव देऊन शिक्षण द्या जेणे करून विद्यार्थी स्पर्धेचा सामना करू शकतील असे सर्व प्रयत्न शहरातील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल मध्ये होताना दिसत आहेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे उद्घाटक राहुल लोणीकर यांनी शाळेत आयोजित मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विज्ञान प्रदर्शन व तसेच परतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील बाल कवयत्री श्रावणी बरकुले हीच गौरव समारंभ कार्यक्रमा दरम्यान केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नितीन जेथलिया संस्थेचे अध्यक्ष दिनकरराव चव्हाण, डॉ. प्रमोद आकात , रमेशराव सोळंके, बाबासाहेब गाडगे, माधवरावमामा कदम, सुधाकरबापू सातोनकर , विजयनाना राखे, एम.डी. सवणे, अखिल काजी ,मोईन कुरेशी, संदीप बाहेकर, कल्याणराव बागल, शत्रुघ्न कणसे , राजेश काकडे ,महेश नळगे, प्रा.डॉ. पांडुरंग नवल, रमेशराव भापकर ,जितूअण्णा अंभोरे, अशोकराव बुरकुले ,मधुकर झरेकर, नितीन जोगदंड, डॉ. श्रीमंत सुरवसे, प्रकाश चव्हाण, कृष्णा आरगडे ,राजेश भुजबळ ,बाबुराव वांजुळकर ,सुबोध चव्हाण ,संतोष चव्हाण, प्राचार्य गजानन कासतोडे ,शंकर चव्हाळ आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन जेथलिया, प्रा. पांडुरंग नवल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण श्रावणी बरकुले हिचा सर्व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यावेळी श्रावणी बरकुले हिने कवितांचे सादरीकरण केले.
सदरील कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विषयावर विज्ञान प्रयोग सादर केले तसेच चिमुकल्या मुलांनी मराठी लोकगीत, भारुड, बडबड गीत, लावणी, विविध संताच्या, थोर पुरुषांच्या वेशभूषा सादरीकरणाने सर्व प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता सदरील मुलांच्या विज्ञान प्रयोग सादरीकरण व कलाविष्काराचे सर्व प्रेक्षकांनी व प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती शिनगारे मॅडम प्रास्ताविक प्राचार्य कास्तोडे व आभार प्रदर्शन श्रीमती मुंदडा मॅडम यांनी केले.