जागतिक क्षयरोग दिनानिमित्त डॉ.संदिप चव्हाण सर यांचा जालना येथे सत्कार!
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
क्षयरोगी रुग्णांच्या ऊत्कृष्ट सेवेबद्दल क्षयरोग निर्मूलनाच्या शासनाच्या मोहिमेमध्ये हातभार लावण्याची नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल परतूर येथील डॉ.संदिप चव्हाण यांचा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात जिल्हा मुख्य कार्यकारी मनुज जिंदाल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अर्चना भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला!
याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री. विजय राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खतगावकर, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होती!