पारडगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा संपन्न पारडगाव/अंतरवाला ग्रुप ग्रामपंचायत विभक्त करा ग्रामस्थांचा सुर
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव/अंतरवाला बू ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दि.१२
मार्च रोजी सरपंच शशिकला साहेबराव खरात यांच्या अध्यक्षेतखाली ग्रामसभा
यावेळी ग्रामसभेला सदस्य प्रतिभा विष्णु माकोडे, गोरख जाधव, ग्रामविकास
अधिकारी दीपक साळवे, लिपिक रामेश्वर ढेरे, उपस्थित होते. यावेळी ग्राममसभेत विशेष करून ग्रुप ग्रामपंचायत असल्याने अंतरवाला स्वतंत्र
ग्रामपंचायत करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसापासून होत होती. या झालेल्या ग्रामसभेत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास ठराव घेण्यात
आला. तसेच गावातील नाल्या रस्त्ये, स्मशानभूमी वॉल कंपाऊंड, मंदिर परिसर
विकास, लाइट, पाणी, स्वच्छता, हात पंप दुरूस्ती, स्वछालय, वयक्तिक लाभ योजना बाबत देण्याबाबत चर्चा करून ठरावात नमूद केल्या आहेत. या
ग्रामसभेला प्रकाश कोकणे, बाबासाहेब माकोडे, विष्णु अण्णा माकोडे, महादेव माकोडे, धर्मराज माकोडे, लक्ष्मण गोरे, गणेश माकोडे, कैलास मगर, मसूद सय्य्द, जावेद सय्य्द भगवान टोनपे, दिलीप माकोडे, अजिक्य माकोडे, भारत
टोणपे, शंकर काळे, दत्ता गोरे, भुजंगराव माकोडे, दत्ता तांगडे, राजेभाऊ माकोडे, परमेश्वर माकोडे, प्रदीप जाधव, रामा जाधव , नानाभाऊ घोगरे, लक्ष्मण जाधव, अर्जुन
माकोडे, एकनाथ माकोडे, कृष्णा काळे, गफ्फार सय्यद यांच्यासह
पारडगाव/अंतरवाला येथील ग्रामस्थांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
अंतरवाला बू गावाच्या विकासाला बळ देण्यासाठी वेगळी ग्रामपंचायत करण्यासाठी ठराव घेतला आहे. गावचा सर्वांगीक विकास* *करण्यासाठी नेहमी पुढाकार घेऊन काम करण्यास कटिबद्ध राहील. राजकारण न करता ग्रामस्थांना*
*वयक्तिक लाभाचा योजना मिळवून देऊ -- प्रतिभा विष्णु माकोडे सदस्य पारडगाव अंतरवाला बू*
गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून पारडगाव/अंतरवाला ग्रुप ग्रामपंचायत असल्याने अंतरवाला येथील गावचा विकासाला चालना मिळत नाही. या बाबत पालकमंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे गाव विभक्त करण्यासाठी मागणी केल्याने त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यांच्याकडे पाठपुरावा करून ग्रामपंचायत विभक्त करू – बाबासाहेब माकोडे, अंतरवाला बू