दुकान जळीत प्रकरणी आकात यांनी केली 21 हजारांची मदत
परतूर प्रतिनधी हनुमंत दंवडे
दि.२७ - शॉर्टसर्किटने किराणा दुकानास आग लागून मोठे नुकसान झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांनी दुकानदार शेख अयाज यांना 21 हजार 101 रुपयांची आर्थिक मदत केली.यामुळे पीडित दुकानदारास दिलासा मिळाला.
शहरातील गाव भागातील लड्डा कॉलनीत शेख अयाज यांचे किराणा दुकान आहे.या दुकानावरच शेख यांची उपजीविका चालते.परंतु सोमवारी (दि.25) अचानक शॉटसर्किट होऊन दुकानास आग लागली.क्षणार्धात आग संपूर्ण दुकानात पसरून दुकानातील किराणा सामान जळून खाक झाले.त्यामुळे करावे तरी काय असा प्रश्न शेख यांना पडला.उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते हतबल झाले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल भैया आकात यांच्या कानावर टाकली.आकात यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेख अयाज यांना 21101/- रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.
यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे,नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखिल काजी,विजय राखे, आरेफ अली, रियाज कुरेशी, कदिर कुरेशी ,रफिक कुरेशी , रज्जाक कुरेशी,नासेर चाउस,अन्वर पठाण , आफरोज सौदागर यांची उपस्थिति होती.
-----------------------------
ऐन रमजान महिन्याच्या काळातच दुकानाला आग लागल्याने शेख कुटुंब अडचणीत सापडले होते.परंतु कपिल भैया आकात यांनी वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे या कुटुंबाला निश्चितच दिलासा मिळाला आहे. - विनायक काळे,माजी नगराध्यक्ष, परतूर.