हेलस येथे शाळा प्रवेश पूर्व तयारी मेळावा संपन्न
मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.20/04/2022 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हेलस येथे इयत्ता पहिली शाळा प्रवेश पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम अगोदर वाजत गाजत गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा राजेभाऊ खराबे यांच्या हस्ते फीत कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले .या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. प्रत्येक स्टॉलवर शिक्षक ,अंगणवाडी ताई व विद्यार्थी स्वयंसेवक यांनी काम पाहिले.
नोंदणी-उंची- वजन ,शारीरिक विकास ,बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास ,भाषा विकास ,गणन पूर्व तयारी याबाबत बालकांकडून कृती करून घेण्यात आली व साहित्य वाटप करण्यात आले .माता पालकांना मार्गदर्शन करण्यात आले .साहित्याचा वापर करून हसत खेळत बालकांनी सहभाग नोंदवला. मेळाव्याला पालकांचा व बालकांचा प्रतिसाद चांगला होता. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष दीपक खराबे,दगडूबा
पाटील खराबे ,साहेबराव खराबे,सतीश खराबे ,राजेभाऊ खराबे ,भारतराव खराबे, केशवराव खराबे, दत्तराव खराबे,नारायण खराबे, सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य अंगणवाडी ताई, शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.आर.बी.कुडे मुख्याध्यापक यांनी केले. तर सूत्रसंचालन श्री सोनुंकर सर यांनी केले व शेवटी आभार प्रदर्शन श्री टकले सर यांनी केले.