महेश भालेकर यांची पारडगाव येथील राशन दुकानावीरो धात तक्रार अर्ज तहसील कार्यालय घनसावंगी यांना सादर..
प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
घनसावंगी तालुक्यातील पार डगाव येथील रहिवासी महेश नामदेव भालेकर यांनी गावातील रेशन दुकानदार असेफा सर फरोउद्दीन यांनी मागील चार महिन्यांमध्ये केवळ एक वेळेस रेशन वितरित केले आहे तसेच हे दुकानदार जनतेचे ऐकून घेत नाहीत. त्यांना वेळेवर रेशन देत नाही त्यांना रेशन मागण्यासाठी गेले असता उलट-सुलट भाषेचा वापर करून उत्तर देतात व ते नेहमी सांगतात की मी गावाचा आहे किंवा माझ्या मागे काम आहे असे उत्तर देऊन राशन देण्यास नागरिकांना टाळाटाळ करतात. काही निराधार कुटुंबांना केसरी कार्ड प्रमाणे रेशन वितरित केल्या जात आहे गावकरी मंडळी कडून शासन दरापेक्षा अधिक प्रमाणात शुल्क सुद्धा राशन दुकान दुकानदाराकडून आकारले जात आहे हा सर्व प्रकार तक्रारी अर्ज मार्फत तहसील कार्यालय घनसावंगी येथे महेश भालेकर यांनी दिला आहे तहसीलदार हे चौकशी करून या राशन दुकानावरती काय कारवाई करणार आहेत याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे..