तळणी येथे हिन्दू नववर्षाच्या निमित्याने कुस्त्याच्या दंगलीचे आयोजन
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील तळणी येथे हिन्दू नववर्षाच्या निमित्याने कुस्त्याच्या दंगलीचे आयोजन तळणी ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले होते महाराष्ट्राच्या विविध जिल्हातून जवळपास दोनशेच्या वर मल्लानी या ठिकाणी हजेरी लावली विशेष बाब म्हणजे मुलीचा सुध्दा मोठा सहभाग यावेळी दिसुन आला
गेल्या दोन ते तीन वर्षापासून कोरोना महामारी मुळे या कुस्त्यावर निर्बध असल्याकारणाने हा खेळ होऊ शकला नाही वाशीम बुलढाणा परभणी हिंगोली जालना बीड औरगांबाद नांदेड जळगाव सांगली सांतारा या जिल्हातून मोठ्या संख्येने मल्लानी सहभाग नोदविला लाखो पाचशे रुपयापासून ते दहा हजाराच्या वरचे बक्षीस प्रत्येक कुस्तीसाठी ठेवण्यात आले होते आठ वर्षाच्या मुली पासुन पच्चावन्न वर्षाच्या वयोवृद्ध मल्लानी या सर्धत सहभांग घेतला तळणी येथील कुस्त्याची ही परंपरा शंभर वर्षापेक्षा जास्तीची आहे कोरोना निर्बध हटवल्यानंतर नविन मराठी वर्षातील हा पहिलाच सण असल्याने मोठया संख्येने व उत्लासाने प्रेक्षकांने मोठी गर्दी या वेळी केली होती या वेळी विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची उपस्थीती होती तळणी येथील कुस्तीची समिती गेल्या आठ दीवसापासून या साठी परिश्रम घेत आहेत लोक वर्गणीतून मोठया प्रमाणात बक्षीसांची रक्कम जमा करण्यात आली भडांरेश्वर संस्थानच्या बाजूच्या शेतात या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते