निर्धास राठोड सरपंचपदी कायम
आष्टी प्रतिनीधी सूधाकर जाधव
ग्रामपंचायत हस्तूर तांडा चे सरपंच निर्धास राठोड यांच्या विरुद्ध रावसाहेब आढे यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे सरपंचाने कुटुंबातील सदस्याच्या नावे धनादेश दिला म्हणून विवाद अर्ज दाखल केला होता व जिल्हाधिकारी जालना यांनी विवाद अर्ज मंजूर करत सरपंच पद निरर्ह ठरवले होते सदरील निर्णयाच्याविरुद्ध सरपंच यांनी विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात स्थगिती अर्जासह अपील दाखल केले होते .
स्थगिती अर्जावरील युक्तिवादानंतर सरपंचाचे व भावाचे कुटुंब हे वेगळे आहे व शिधापत्रिका देखील वेगळी आहे अशा सर्व बाबींचा विचार करत जिल्हाधिकारी जालना यांच्या निर्णयास स्थगिती देत निर्धास राठोड यांना ग्रामपंचायत हस्तूर तांडा च्या सरपंच पदी कायम ठेवले आहे . राठोड यांच्या वतीने विधिज्ञ वैभव कुलकर्णी यांनी काम पहिले .