जिल्ह्यातील अपंग निराधार वयोवृद्ध यांची पेन्शन बँक खात्यात जमा करावी___ अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुकयातील व जिल्ह्यातील अपंग निराधार वयोवृद्ध यांची गेल्या चार महिन्यापासून शासनामार्फत दिली जाणारी मासिक पेन्शन झालेली नाही तरी ,अपंग वयोवृद्ध यांचे जीवन हे पेन्शनवर अवलंबून असून व शासनामार्फत दिली जाणारी पेन्शन सुद्धा चार महिन्यापासून मिळालेली नाही तसेच दुसरीकडे महागाई वाढत असून जीवन जगणे कठीण होत आहे दुसरे कोणतेही साधन नसल्यामुळे आज अपंग व वृद्ध यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे