येणार्‍या पालिका निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार – ऐ जे बोराडे

परतूर प्रतिनिधी  हनुमंत दवंडे 
येणाऱ्या काळात पालिका निवडणुकासाठी पक्ष प्रमुखाकडून कोणत्याच पक्षाची युती केली जाणार नसल्याचे भूमिका त्यांनी जिल्हाप्रमुखाच्या बैठकीत घेतली असल्याने येणार्‍या पालिका निवडणुकीत शिवसेना कोणत्याच पक्षाची युती करणार नसून स्वबळावर लढणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे यांनी दिली ते परतूर येथे शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे परतूर तालुकाप्रमुख अशोक आघाव, मंठ्याचे अजय अवचार, सुर्दशन सोळंके, दत्ता सुरूग, विदुर जईद, भगवान सुरूंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना बोराडे म्हणाले की शिवसेनेच्या व आघाडी सरकारच्या माध्यमातून रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून परतूर तालुक्यासाठी दहा कोटी रुपये निधि आणून पाणंद रस्त्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात रस्त्याचा कामातून विकास होणार आहे. शहाराच्या विकासासाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, विनोद घोसाळकर, यांच्याकडे मागणी करून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा प्रमुख ऐजे बोराडे, मोहन अग्रवाल, तालुकाप्रमुख अशोकराव आघाव, बाबासाहेब तेलगड, यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून नगरविकास मंत्री यांच्याकडून शहराला चार कोटी निधी मिळाला आहे. लवकर विकास कामांना सुरुवात होईल.  
शिवसेना आघाडी सरकार विकास करीत असल्याने सध्या आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपाकडून सूडाचे राजकारण केले जात आहे. खालच्या पातळीवर राजकारण करून धाडसत्र सुरू केले. मात्र शिवसेना घाबरणार नाही. सेनेची बदनामी करण्यासाठी हे षडयंत्र सुरू आहे. शिवसेनाच चेहरा हे खासदार संजय राऊत चुकीचं करणार नाही. कितीही बदनामी केली तर काही फरक पडणार नाही. काहीच परिणाम होणार नाही. संधी सर्वांना आहे. भाजपाचे नेत्यांची सगळी माहिती काढून यांची माहिती काढू अगोदर काय होत आणि आता किती मालमत्ता आहे हे सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्र काय चाललं हे लोकांना कळत आहे. भाजपचा डाव कधीही शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही.
शिवसेनेत निवडणुकीत कोनतेहि गटबाजी होऊ देणार नाही. एकत्र बसून निर्णय घेऊ निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरू. शहर व ग्रामीण भागात सध्या १४ कोटी निधी मिळाला आहे. निवडणुकीत त्यांचे फळ मिळेल शिवसेनेत गटबाजी करण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. आता परिवर्तन होईल. 
ऐकेकाळी दारीद्ररेषेच्या यादीत असलेले काही नेते काही वर्षातचं करोडपती झाले कसे हे सोडुन भाजपा ईडीचा दाखवुन महाअघाडीच्या नेत्यांनाचं विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ऐ.जे.बोराडे यांनी केला.
राज्यातील महाअघाडी सरकार सक्षमपणे आपले काम करत असुन समान विकासधोरणाप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात विकास कामांसाठी करोडो रूपयाचे पॅकेज अघाडीतील मंत्री देत आहेत. यामुळे नागरीकांना मिळत असलेल्या सुविधेबाबत सर्वमामान्य समाधान व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.
येणाऱ्या जिल्हा परिषद, नगर पालीका निवडणुकीत शिवसेनेने ऐकला चलो रे ची भुमिका घेतली असुन कार्यकर्त्यांनाही पदाच्या माध्यमातुन न्याय मिळावा. तसेच गावागावात शिवसेना पक्षाच्या चळचळीला वेग मिळावा या दृश्टीने शकतो निवडणुकीत शिवसेना कुणाचीही साथ न घेता निवडणुक रिंगणात उतरणार असल्याची त्यांनी माहिती दिली. भाजपाला राज्यात सत्तेवरूण खाली खेचण्यात शिवसेना नेते संजय राउत यांचे मोठी भुमिका आहे. हीच खदखद भाजपाला सतावते व भाजपाच्या अन्यायी धोरणा विरुद्ध महाअघाडीचे नेते मंत्री सडाडुन रोखठोक बोलत असल्यानेचं केद्रातील सत्तेच्या ताकतीचा गेरफायदा घेत भाजपा ईडीच्या आडुन महाअघाडीच्या सुरळीत चाललेला कारभारात व्यत्यय आनण्याचा पर्यन्त करत असल्याचे शेवटी ते म्हणाले. त्यांचे मनसुबे उधळत महाअघाडी हे पाच वर्ष कारभार सुरळीत चालवतील. ईडी धाक आम्हालाचं का असे म्हणत भाजपा का धुतल्या तादंळांचा आहे का असा सवाल बोराडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी अमोल सुरुंग, संदीप पाचारे, भारत भुसारे, रामजी खवल, सखाराम इंगळे, बाळू गाते, विजय ठोंबरे, दीपक हिवाळे, बबा सोळंके, हे उपस्थित होते. 

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....