जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा खोराड सावंगी विजेता तर आन्वीचा संघ उपविजेता
मंठा-प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.२४ बालेवाडी, पुणे येथे मे २०२२ मध्ये होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद कुमार व कुमारी कबड्डी स्पर्धेसाठी जालना जिल्हा कबड्डी असोसियशनच्या वतीने प्रनुसरा नगर, मंठा येथे २३ रोजी आयोजित जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मंठा तालुक्यातील खोराड सावंगीचा संघ विजेता ठरला तर बदनापूर तालुक्यातील आन्वीचा संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेचे उद्घाटन युवानेते राहुल लोणीकर यांच्या हस्ते झाले तर याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास पालवे, गणेश खवने, सतीश निर्वळ, विठ्ठल काळे, प्रसाद बोराडे, गणेश शहाणे, विजय घोडके, दत्ताराव खराबे, गंगाराम हावळे, नारायण दवणे, राहुल वाव्हळे, नंदकिशोर खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेत जिल्हाभरातून कुमार गटातील चौदा कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला तर कुमारी गटातील संघांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. यावेळी राहुल लोणीकर यांनी जालना जिल्ह्याच्या संघाने राज्य अजिंक्यपद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी आपल्या क्रीडाकौशल्य पणास लावावे असे आवाहन केले.
या निवड चाचणी स्पर्धेत पंजाब वाघ, बाबासाहेब मंडाळे, राजू थोरात, संतोष नागवे, नाना पाटोळे यांनी पंच म्हणून काम पाहिले तर के. जि. राठोड, गौतम वाव्हळ, पंकज राठोड, गणेश खराबे, कैलास उबाळे, गजानन शिवापुरे, मनोज ठाकरे, सतीश राठोड, जगदीश कुडे यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.