२९ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन मंठा येथे होणार आयोजन
मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
दि.२५ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन तारीख 28 व 29 मे रोजी मंठा येथे होणार असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंठा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत 29 वे साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष फुलचंद नागटिळक , मराठवाडा सरचिटणीस अनिल खंदारे , जालना जिल्हा अध्यक्ष कुलदीप रुघे , भरत मानकर ,प्रा.गौतम वाव्हळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या संमेलनात ग्रंथदिंडी , उद्घाटन समारंभ , परिसंवाद , चर्चासत्र , कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम संमेलनात होणार आहेत. या साहित्य संमेलनात देशभरातून 400 साहित्यिक सहभागी होणार आहेत. तसेच या अगोदर सांगली , रत्नागिरी, नवी मुंबई , गोंदिया , बारामती या ठिकाणी संमेलन संपन्न झाली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.याप्रसंगी शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.