परतुर नगरपालिकेच्या घरपट्टी वाढी विरोधात राष्ट्रवादीचे लक्षणिक उपोषण
परतूर,प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर नगरपालिका प्रशासनाने वाढवलेल्या घरपट्टी च्या विरोधात बुधवारी (ता. 20) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष कपिल आकात यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी मुख्यआधिकरी याना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, तत्कालीन नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांच्या कार्यकाळात कर वाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जी कर वाढ करण्यात आली आहे ती सामान्य जनतेला न परवडणारी आहे. या करवाढीला तत्कालीन नगरसेवक अंकुश तेलगड यांनी विरोध देखील केला होता.असे पण या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर मा नगराध्यक्ष विनायक काळे,अंकुश तेलगड,विजय राखे, संतोष चव्हाण, आरिफ अली,कदिर कुरेशी,सत्तार कुरेशी, संजय राऊत,परवेज देशमुख,शिवशंकर स्वामी,रजाक कुरेशी आदींच्या साह्य आहेत.
दर चार वर्षाला घरपट्टी ची करवाढ करणे अनिवार्य असते. तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत ठराव घेऊन ही करवाढ करण्यात आली आहे. ही कर वाढ नियमबाह्य नाही.
सुधीर गवळी ,मुख्याधिकारी, परतूर
नगरपालिका प्रशासनाने जी कर वाढ केली आहे ती सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारी नाही. तात्कालीन नगराध्यक्ष विमलताई जेथलिया यांनी हेतुपुरस्कर ही कर वाढ केली आहे.
विनायक काळे ,मा.नगराध्यक्ष,परतूर