परतूर येथील नाफेड केंद्रावर होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी .सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शेजुळ यांचे उपोषण..



परतूर/प्रतिनिधी:-हनुमंत दवंडे
परतूर येथे नाफेड केंद्र चालकाकडून हमाली व चाळणीच्या नावाखाली शेतकऱ्याच्या आर्थिक पिळवणून होत असल्याची तक्रार 
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग शेजुळ यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक २८ एप्रिल रोजी केली होती 
या अनुषंगाने आज पर्यंत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या वतीने कोणत्याही प्रकारे कारवाई नाही म्हणून श्री पांडुरंग शेजुळ यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर समोर उपोषन सुरू केले असून 
परतूर येथील नाफेड केंद्र चालकाकडून शेतकऱ्याकडून हमालीच्या नावाखाली प्रत्येकी क्विंटल मागे १५० रुपये घेतलेले पैसे परत करण्यात यावे,नाफेड केंद्र चालकांच्या संस्थेवर कार्यवाही करून काळ्या यादीत टाकण्यात यावे तसेच नाफेड केंद्र चालकाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अश्या विविध मागण्यांसाठी पांडुरंग शेजुळ यांनी उपोषन सुरू केले आहे.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी हे परतूर येथील सुरू असलेल्या नाफेड चालकाला पाठीशी घालत आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....