२१ मे रोजी होणाऱ्या भव्य रास्ता रोको आंदोलन व ओबीसी परिषदेसाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा- ओबीसी परिषदेचे आवाहन
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले जे मध्यप्रदेश मध्ये होऊ शकतो ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा संतप्त सवाल प्रत्येक ओबीसी समाजाचा व्यक्ती आज विचारतो आहे आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी आपलं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्ती संघर्ष करण्यासाठी तयार आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
मध्यप्रदेशातील राज्य सरकारने ओबीसींसाठी सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या अटींप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाचे नेमणूक केली ओबीसींचा इमपेरिकल डेटा तयार केला ट्रिपल टेस्ट ची अट पूर्ण केली आणि तेथील ओबीसी आरक्षण टिकले परंतु महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा सरकार म्हणून कुरघोडी करत सत्तेत आलेले सत्ताधारी मात्र केवळ वसुली करण्यात मग्न आहे आहेत ओबीसींच्या इंटरिकल डेटा ट्रिपल टेस्ट किंवा राज्य मागासवर्ग आयोगाच्या निवडणुकीबाबत ब्र शब्द न करता केवळ केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरड करण्यात धन्यता मानत होते परिणामी ओबीसींचे हक्काचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले यासाठी पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे जे मध्यप्रदेशमध्ये होऊ शकतो ते महाराष्ट्रात का नाही? असा संतप्त सवाल त्यामुळेच प्रत्येक ओबीसीच्या मनात आहे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
राज्य शासनाच्या या नाकर्तेपणा आणि मूर्खपणाचा निषेध करण्यासाठी सरकारला ओबीसींची ताकद दाखवून देण्यासाठी ओबीसींच्या न्याय हक्काचं राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वात व भाजयुमोचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत *उद्या दिनांक २१ मे २०२२ शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता विडोळी फाटा मंठा* येथे भव्य रस्ता रोको आंदोलन तर त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा लढा पुढे घेऊन जाण्यासाठी विचार विमर्श व्हावा या उद्देशाने *श्री गणेश मंगल कार्यालय संत तुकाराम नगर ऊस्वद रोड मंठा येथे ओबीसी परिषद* चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निरवळ भाजपा परतुर तालुका अध्यक्ष रमेश भापकर भाजपा जालना ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रकाश टकले गणेशराव खवणे सभापती संदीप भैय्या गोरे उपसभापती राजेश मोरे सभापती रंगनाथ येवले सभापती सौ शिल्पा पवार भाजपा महिला जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव माऊली शेजुळ जि प सदस्य हरिराम माने सुभाषराव राठोड पंजाब बोराडे शिवदास हनवते उपसभापती नागेश घारे उपसभापती रामप्रसाद थोरात, सुधाकर बापू सातोनकर बिडी पवार दिलीप पवार मंठा शहराध्यक्ष प्रसादराव बोराडे शेषनारायण दवणे विकास पालवे डॉ शरद पालवे रामदास घोंगडे, अन्साबाई राठोड महादेव वाघमारे रमेश आढाव, दत्ता कांगणे नाथराव काकडे नारायण काकडे केशव येऊल गणेश हरकळ हरकळ प्रवीण सातोनकर सिद्धेश्वर केकान रामकिसन बोडखे विष्णू गायकवाड सिताराम राठोड रमेश राठोड निर्धास्त आढे अशोक राठोड रावसाहेब आडे अविनाश राठोड राहुल काळे विष्णू डोने, नंदकुमार गांजे, जगदीश पडुलकर, तानाजी शेंडगे बालाजी सांगुळे प्रकाश मुळे कैलास चव्हाण सिद्धू मगर कृष्णा अरगड भगवान पाटोळे अजय चव्हाण प्रकाश गबाळे शिवशंकर डोईफोडे बाबाजी जाधव अनिल चव्हाण भारत राठोड गोपीचंद पवार श्रीराम राठोड जनार्दन इंगळे द्वारकादास चिंचाणे प्रल्हाद चाळक राजू पवार राम राठोड जालिंदर राठोड सुभाष चव्हाण डॉ श्याम वाघ सुनील नागरे विकास जाधव शिवाजीराव थोरवे सोपान गायकवाड जानकीराम चव्हाण यांनी केले आहे...