एस. एम. इंग्लिश स्कूल खांडवी येथे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
====================
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील खांडवी एस. ए.म इंग्लिश स्कूल मध्ये
सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त एस. एम. इंग्लिश स्कूल खांडवी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी उपस्थित एस. एम. इंग्लिश स्कूल चे प्रिन्सिपल शेख सर ,शिक्षक सुरुंग सर ,दौंडे सर, आयशा मॅडम, सायमा मॅडम, व सर्व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक दौंडे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरुंग सर यांनी मानले.