वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्नशील – पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे

      
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी पोलिस प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे. पोलिस प्रशासन काम करीत असतांना वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी केले.
येथील आष्टी रेल्वेगेट जवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्धभवत आहे. येथे उड्डाण पुलाचे काम चालू असल्याने एकेरी वाहतूक आहे. एका बाजूचा रस्ता बंद असल्याने रेल्वेगेट जवळ वळण रस्ता आहे. दोन वाहने एकाच वेळी वळत नसल्याने वाहतूक कोंडीस अडथळा निर्माण होत आहे. येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने वाहतूक पोलिसांची नेमणूक केलेली आहे. रेल्वेगेट बंद झाल्यास काही काळ वाहतूक थांबत असल्याने वाहनाच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक वाहने बाहेर काढण्यास घाई करून कधी अडथळा होण्यास करणीभूत ठरत आहे. पोलिस अश्या वाहनावर कारवाई केली. काहींना समज दिली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरुळीत करण्यासाठी प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठक घेतल्या मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस प्रशासन हे जबाबदारी घेत स्वत रेल्वेगेट वरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन जातीने लक्ष घालून वाहतूक वर्दळ जास्त असल्याच्या दिवशी स्वत उभा राहून वाहतूक सुरळीत करून शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी पोलिसांना नागरिकांचे वाहन चालकांचे तितकेच सहकार्य महत्वाचे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.
 

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....