पोलिस पाटील तुकाराम शिंगटे यांचे निधन
परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
तालुक्यातील आनंदवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक पोलिस पाटील तुकाराम आंबादास शिंगटे यांचे अल्पशा आजाराने दि २८ मे २०२२ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निधन झाले. मृत्यू समयी ते ६५ वर्षाचे होत.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, एक भाऊ, चार बहिणी, जावई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आनंदवाडी येथे शेतात दुपारी दोन वाजेचा सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.