मंठा तालुक्यातील गुटका विक्री थांबेना...शहरात व खेड्या-पाड्यातील किराणा दुकानावर गुटखा विक्री जोरात ; संबंधित विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
दि.३० शहरासह तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा बोकाळली आहे. शहरातील प्रत्येक व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील किराणा दुकानात सहजपणे गुटखा उपलब्ध होत आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मंठा तालुका मराठवाड्यातील गुटखाविक्रीचे केंद्र झाले आहे.याकडे जिल्हा वरिष्ठ अधिकारी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
मागील तीन वर्षापासून गुटका विक्रीने कळस गाठला आहे.तालुक्यात व शहरात गुटका विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. गुटखा विक्री करणारे माफीया संबंधित विभागाला हाताशी धरून आपला काळाबाजार चालवत आहेत.याकडे वृत्तपत्र अथवा इतर कोणी यावर आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तर त्यांची मुस्काट दाबी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. किवा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येते.यामुळे गुटका माफियाची दादागिरी शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. मागील पंधरवड्यात दोन-तीन दिवस गुटका विक्रीलाचा चाप बसला होता. परंतु पुन्हा आर्थिक हव्यासापोटी गुटखा विक्री गोरख धंदा शहर परिसरात व खेड्यापाड्यात बोकाळली आहे.
मानवी आरोग्यास हानिकारक असलेल्या गुटका शहरात सहजपणे उपलब्ध होत असल्याने शालेय विद्यार्थी व्यसनाधीन होत आहे.यामुळे
युवा पिढी व्यसनाच्या आधीन जात असून त्यांच्या आरोग्य धोक्यात येत आहे राज्य शासन व प्रशासनाकडून गुटखा विक्रीवर बंदी आणली आहे. परंतु , आर्थिक हव्यासापोटी गुटका माफिया संबंधित विभागाशी अर्थपूर्ण व्यवहार करून आपला डाव साधत कोट्यवधीची कमाई करत आहेत. शहर व परिसरात गुटखा माफियांची दादागिरी वाढ वाढत चालली आहे व युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. यासारख्या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे , अशी मागणी नागरिकांतून होत आहे.