घरपट्टी वाढ प्रकरणी आक्षेपास मुदतवाढ देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
परतूर: प्रतिनिधी हनुमंत दंवडे
परतूर नगरपालिकेच्या वतीने सन 2022 ते 2026 साठी नुकत्याच शहरात मालमत्तेचे कर आकारणी साठी सर्वे करण्यात आल्यानंतर भरमसाठ आलेल्या घरपट्टी बाबत संपूर्ण शहरभरात सत्ताधारी विरुद्ध ओरड सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, व भाजप या विरोधकांनी याविरुद्ध आपला आवाज बुलंद केलेला आहे,
या जुलमी घरपट्टी विरोधात आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख 5 मे पर्यंत होती, आक्षेप नोंदविण्यास मुबलक अवधी नाही, शिवाय अनेक नागरिकांना करआकारणी बाबतच्या नोटीसाच मिळालेल्या नाहीत, या काळात अनेक सण व सुट्ट्या आल्याने व नागरिकांपर्यंत कर आकारणी ची नोटीस पोचती न झाल्याने आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी एक महिना मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंतीवजा निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे देण्यात आले तसेच मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनाही या आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विनायकराव काळे, नगरसेवक अंकुशराव तेलगड, नगरसेवक अखिल काजी, माजी नगरसेवक आरिफ अली, विजय नाना राखे, माजी नगरसेवक कदिर कुरेशी, युवा नेते गोरे मियां कायमखानी, .इफ्तेखार भाई, रज्जाक कूरेशी, संजय राऊत आदी उपस्थित होते.