परतुर ते चौंडी विशेष बस सेवेसाठी परतूर आगार प्रमुख यांना निवेदन...
परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दंवडे
31 मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी परतुर आगारातून विशेष बस सेवा सोडण्याची मागणी आगार प्रमुख यांना मौर्य क्रांती संघ परतूर यांच्या नेतृत्वा खाली एका निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली
31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्यदिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो .या निमित्ताने चौंडी येथे देशभरातून हजारो भाविक भक्त अहिल्या प्रेमी जमा होतात ,परतूर तालुक्यातील चौंडी येथे जाणाऱ्या भाविक भक्त व अहिल्याप्रेमीची संख्या मोठी आहे. परतूर तालुक्यातील हजारो लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी परतुर आगारातून म्हणजे परतुर, आष्टी, लोणी ,माजलगाव या ठिकाणावरून बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या . निवेदना वरील सह्या हनुमंत दवंडे ,दत्ता कोल्हे, विलास रोकडे ,भागवत रोकडे, विलास तरव टे, नामदेव गोरे, शिवाजी भालेकर ,बाबू गोसावी, शिवाजी तरवटे ,माऊली बोराटे, प्रमोद पिसाळ, कृष्णा गायकवाड, दादाराव बकाल , विलास रोकडे,राम दुगाने, कृष्णा गायकवाड, यावेळी आदींची उपस्थिती होती.