राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करा. -हनुमंत दवंडे मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष

जालना जिल्हा प्रतिनिधी/ समाधान खरात
गेल्या वर्षी कोरोना व्हायरस असल्या मुळे जयंती फार मोठया उत्साह साजरी करता आली नाही महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवानी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरा घरात साजरी करा असे आवाहन हनुमंत दवंडे यांनी केले आहे
        31 मे रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती येत आहे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास हा संपुर्ण जगात सुप्रसिद्ध आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी संपुर्ण जीवन चरित्र प्रेरणादायी आहे, त्यांनी जवळ जवळ माळवा प्रांता वर 29 वर्ष राज्य केले .आणि त्यांचा राज्य कारभाराचा ठसा संपुर्ण देशात उमटला होता, त्यांनी अनेक जनकल्याण कारी कार्य केले मंदिर, घाट, रस्ते, धर्म शाळा तर संपूर्ण देश भर बांधल्या, अनेक अंधश्रद्धा असलेल्या परंपराना प्रतिबंध घातला त्यांच्या बुद्धी चातुर्याने अनेक वेळ संघर्षा तुन होणारी हानी टळली, प्राणी मात्राची व निसर्गाची विशेष काळजी घेतली, शेती, व्यापार, इतर व्यावसायी भरभराटकेली, आजचा 7/12 कायदा हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या काळात विकसित झाला होता, राजकारण समाज कारण अर्थ कारण विकास कारण इत्यादी क्षेत्रात,,,,,,,, त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला व उच्चस्थान गाठले, संघर्षमयी जीवनाचा कसा सामना करावा हे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चारित्रातुन प्रेरणादायी ठरते म्हणूनच अशा महान वीरांगनेचा इतिहास समाजा पर्यंत पोहचला पाहिजे व त्यांनी केलेल्या कार्याची कृतज्ञता म्हणून त्यांची जयंती समाज बांधवानी घरो घरी साजरी करा असे आवाहन हनुमंत द वंडे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....