माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या मारेकर्याना कठोर शिक्षा व्हावी-- सिल्लोडे, कटुंबियास दहा लाख रुपयांची आर्थिक मदतीची मागणी
मंठा - प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.२३ यवतमाळ जिल्हा घांटजी तालुक्यातील पारवा येथील रहीवासी माहीती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यराञी अतिशय क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली माहीती आधिकारी अधिनियमानुसार माहीती मागीतली असल्याने सुड भावनेने क्रुर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासानुसार व प्रसार माध्यमातुन समोर आले आहे
हि घटना धक्कादायक असुन महाराष्ट्रांच्या प्रागतिक पंरपरेला काळीमा फासणारी आहे शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणुन काम करणार्या हजारो माहीती अधिकार कार्यकर्त्यांचे जागरुक व संवेदनशिल नागरिकांचे मनोधर्य खचुन जाणारी घटणा घटली आहे मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला लवकर ट्रॕक कोर्टात चालवुन दोषीवर कठोर शिक्षा द्यावी याप्रकारणात अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी सुञधार यांच्याही मुसक्या अवळव्यात माहीती अधिकार कार्यकर्ता म्हणुन जीव धोक्यात घालुन काम करुन प्रशासन शासन पारदर्शक चालावे म्हणुन आपल्या जिवाची बाजी लावणार्या मृत कार्यकर्ता यांच्या कुटुंबास किमान दहा लाख रुपये मदत सरकारणे जाहीर करावी धमक्या देणे हल्ले करणे मारहाण करणे व हत्या होणे अशा घटने मधे वाढ होत आहे सुरक्षा व संरक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपायोजना अंमलात आणाव्या संबधी कडक उपाय योजना करण्यात याव्या माहीती अधिकार कार्यकर्त्यांस पोलीस संरक्षण द्यावे अश्या मागण्या माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघ जिल्हा अध्यक्ष जयसिंग सिल्लोडे व ज्ञानदेव दत्तात्रय मंठा प्रचार मुरलीधर दिगंबर बिडवे मंठा संपर्कप्रमुख.यांनी केल्या आहेत