अवैध वाळू वाहतूकीचा टेम्पो पकडला,अवैध वाळू चोरीच्या तक्रारी : वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई
तळणी प्रतिनीधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील सासखेडा येथुन अवैध वाळू उपसा करत वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो क्र. एम एच २१ बी एच ७३३३ याला दिंडी महामार्गावर ठेंगेवडगाव येथे तहसीलदाराने गुरुवारी दुपारी २ वा. पकडले.
पूर्णा नदीपात्रातील ऊस्वद , देवठाणा, लिबखेडा, सासखेडा, दुधा , पोखरी केंधळे व भूवन येथून दिवसरात्र वाळू उत्खनन व चोरी सुरू असल्याची तक्रार जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे करण्यात आली होत्या. या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठांच्या आदेशानंतर मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे व तलाठी नितीन चिंचोले यांनी सासखेडा येथील संतोष जाधव यांच्या मालकीचा अवैध वाळू वाहतूकीचा टेम्पो पकडून मंठा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले
मंडळ अधिकारी व तलाठी याच्या कडून कारवाया होताना दिसत नाही पावसाळ्याचे दिवस जस जसे जवळ येत असून अवैध वाळू चोरीची स्पर्धा तळ्णी परीसरात दिसत आहे
*अवैध वाळू चोराची गय केली जाणार नाही वाळू चोरांनी चोरीचा व्यवसाय बदला पाहीजे वाळू चोरावरं आणखी तीव्र करणार असल्याची प्रतिक्रीया तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यानी दीली*