तळ्यात केले तळे म्हणून सरपंचपद गेलेचित्तोडा येथील सरपंचाला जिल्हाधिकाऱ्यानी केले अपात्र


जालना (प्रतिनिधी) समाधान खरात
 बदनापूर तालुक्यातील चित्तोडा येथील गट क्रमांक 16 मध्ये पाझर तलावासाठी जमीन संपादीत असून त्यात तलाव निर्माण असताना तेथील सरपंचाने याच ठिकाणी अतिक्रमण करून शेततळे घेतले होते. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुभाष डिघे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे दावा केला असता, जिल्हाधिकाऱ्यानी सुनावनी अंती सरपंच ज्ञानेश्वर डिघे यांना अपात्र ठरविले आहे.
याबाबत थोडक्यात असे की. चित्तोडा ता. बदनापूर येथील गट क्रमांक 16 मध्ये पाझर तलाव नं. 4 साठी 67 आर शेत जमीन सन 2012-13 मध्ये संपादीत करण्यात आली होती. ज्याचा सी. आर. क्रमांक 80/8 असून अंतिम निवाडा 20 एप्रिल 2011 रोजी झालेला आहे. असे असताना सरपंच ज्ञानेश्वर तुळशीराम डिघे यांनी या संपादीत केलेल्या शेत जमिनीमध्ये स्वतः च्या फायद्यासाठी शेततळे केले, व ते शासनाच्या जमिनीवर केल्याचा दावा चित्तोडा येथील ग्रामपंचायत सदस्य सुभाष दौलतराव डिघे यांनी ऍड. आर. एस. वाघ व एस. पी. हुशे यांच्या मार्फत जिल्हा दंडा धिकाऱ्याकडे दाखल केला होता. त्यानुसार सरपंच ज्ञानेश्वर डिघे यांची कृती मुबंई ग्रामपंचायत अधिनियमांतील कलम 14 (ज 3) मधील तरतुदीचा भंग करणारी आहे. म्हणून कलम 16 प्रमाणे चौकशी करून सरपंच पदासाठी अपात्र ठरविण्याचे दाव्यात म्हटले होते. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या समक्ष याप्रकरणी सुनावण्या घेण्यात आल्या असता, सदर प्रकारणात उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जालना यांचा अहवाल दिनांक 21 फेब्रुवारी 2022 नुसार चित्तोडा येथील पाझर तलाव क्रमांक 4 च्या डॅम लाईन लगत शेततळे केल्याचे आढळले. तसेच गट क्रमांक 16 व 17 यामध्ये परिशिष्ठ -16 मध्येही सरपंच ज्ञानेश्वर तुळशीराम डिघे यांचे नाव आढळून आलेले आहे. विशेष म्हणजे दिनांक 26 जून 2021 रोजी पत्र क्रमांक 237 नुसार ज्ञानेश्वर डिघे यांना सदर शेततळे नष्ट करून जमीन पूर्ववत करण्याबाबत जलसंधारण कार्यालयामार्फत पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला असल्याचे निदर्शनास आले. तसेच तहसीलदार बदनापूर यांचे पत्र दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोजी दिलेल्या नुसार चित्तोडा येथील गट क्रमांक 16 मधील पाझर तलाव क्रमांक 4 मध्ये सरपंच ज्ञानेश्वर डिघे यांचे 67 आर शेतजमीन संपादीत झालेली असून संपादीत झालेल्या क्षेत्रावर शेततळे तयार करण्यात आल्याचे नमूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ज्ञानेश्वर तुळशीराम डिघे यांचे चित्तोडा ग्रामपंचायत येथील सरपंच व सदस्यपदीअपात्र ठरविण्याचा निर्णय (ता. 29) रोजी दिला आहे.

चौकट :- पाझर तलाव मोकळा करण्याची गरज -
चित्तोडा येथील गट क्रमांक 16 मधील पाझर तलावाच्या संपादीत जमिनीत अतिक्रमण करून तयार केलेले शेततळे अनधिकृत आणि नियमबाह्य ठरल्याने आता मूळ पाझर तलाव मोकळा करून देण्याची गरज व्यक्त केल्या जात आहे. जेणेकरून या तलाव निर्मितीचा उद्देश सफल होऊन त्याचा फायदा चित्तोडा येथील नागरिक आणि मुक्या जनावरांना मिळेल.

चौकट :- दोषी अधिकाऱ्यावर कारवाई अपेक्षित -
तळ्यात -तळे निर्माण करणाऱ्या सरपंचाला पदावरून हटविले असले तरी, या सर्व प्रकरणात तत्कालीन पाझर तलावाच्या संपादीत जमिनीत शेततळे मंजूर करणारे कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सेवक व ग्रामसेवक तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे अपेक्षित आहे.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....