पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्मोत्सव प्रत्येक गावागावात साजरा करणार-प्रकाश सोनसळे(धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य तथा सरसेनापती धनगर समाज युवा मल्हार सेना)
बीड प्रतिनिधी
आज बीड येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली.
या अभिवादन सभेचे आयोजक मा. प्रकाश सोनसळे हे अनेक दिवसापासून एक समाजाला नवी दिशा देण्यासाठी हा उपक्रम चालवत आहेत.
आज बीड येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्यास अभिवादन डॉ.योगे साहेब यांच्या शुभहस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर राजे यशवंतराव होळकर प्रतिमापूजन माननीय श्री शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व मल्हाराव होळकर यांच्या प्रतिमेचेपूज मा.श्री.बाबासाहेब लंबाटे अण्णा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रकाश सोनसळे यांनी बोलताना सांगितले की या वर्षी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव प्रत्येकाने आपापल्या गावात साजरा करण्यात यावा यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करुया असे सांगितले.
यावेळी लिंबाजी महानोर साहेब, प्रकाश बुधनर, अमर वाघमोडे ,सतीश लंबाटे, सुधाकर वैद्य ,शीतल मतकर, कोळेकर मनोज, आदी समाज बांधव उपस्थित होते.