शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हाती पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना मिळणार द्विभाषिक पुस्तके
मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
दि.२६समग्र शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता मराठी, उर्दू व सेमी इंग्लिश माध्यमांच्या पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय व अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सदर योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप शाळेच्या पहिल्याच दिवशी करण्यात येणार आहे.मंठा पंचायत समिती अंतर्गत मंठा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या व शासकीय १४९ तसेच खाजगी अनुदानित १९ शाळांतील मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या २०८४, इ. दुसरीच्या १९६९, इ. तिसरीच्या २०५५, इ. चौथीच्या २०३६, इ. पाचवीच्या २०४३, इ. सहावीच्या २०१२, इ. सातवीच्या १९४३ व इ. आठवीच्या २३५१ अशा एकूण १८५३६ लाभार्थी विद्यार्थ्यांना तसेच उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली ८०, दुसरी ७४, तिसरी ७४, चौथी ८०, पाचवी ९१, सहावी ८५, सातवी ८०, आठवी ७९ अशा एकूण ६४३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा लाभ मिळणार आहे.
एकूण पुस्तक मागणी संख्येपैकी आजपावेतो मराठी माध्यामाची ९६ टक्के तर उर्दू माध्यमाची ९० टक्के पाठ्यपुस्तके गट साधन केंद्र मंठा येथे बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाली असून ती लवकरच केंद्रस्तर व शाळास्तरापर्यंत पोहच करण्यात येत असून शाळेच्या पहिल्याच दिवशी अर्थात १३ जून रोजी पाठ्यपुस्तकांचे विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते समारंभपुर्वक वितरीत करण्यात येणार आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना याबाबतीत आगाऊ सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोणताही लाभार्थी विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची प्रशासन काटेकोरपणे दक्षता घेत आहे. या कामी गटशिक्षणाधिकारी सतीष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गटसमन्वयक के. जी. राठोड, अभिमान बायस, विद्या पतंगे, ज्योती चव्हाण, संतोष गिऱ्हे, संदीप उज्जैनकर, जगन्नाथ गुट्टे, प्रशांत सोनटक्के, प्रशांत घाडगे, रामदास माने, सादिक शेख, रमेश निकाळजे आदी परिश्रम घेत आहेत.