राज्यसभा निवडणुकीचा निकाल महा विकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी..
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
राज्यसभा निवडणुकीचा नाट्यमय घडामोडींनंतर अखेर शनिवारी पहाटे निकाल आला. राज्यातील सहा जागांपैकी भाजपला अनुक्रमे तीन शिवसेना, काँग्रेस ,आणि राष्ट्रवादी प्रत्येकी एक जागा जिंकली तत्पूर्वी महाराष्ट्र आणि हरियाणा मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिवसभराच्या गदारोळानंतर संध्याकाळी मतमोजणी थांबवण्यात आली होती .भाजप आणि महा विकास आघाडीने एकमेकांच्या मतदार आमदारावर आक्षेप घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत बैठक घेतली तब्बल साडे आठ तास मतमोजणी रखडली होती. बैठकीनंतर आयोगाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले त्यानंतर मतमोजणी सुरुवात करण्याचे निर्देश दिले होते. मतमोजणी अखेर भाजपचे तीन उमेदवार तर महा विकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
माविआचे तीन उमेदवार तर भाजपची तीन उमेदवार जिंकले पहिल्या पसंतीच्या मतमोजणी मध्ये महा विकास आघाडीचे तीन उमेदवार भाजपचे उमेदवार तीन विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत .त्याचबरोबर भाजपचे उमेदवार पियुष गोयल आणि अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक विजय झाले आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या समजल्या गेलेली सहावी जागा धनंजय महाडिक यांनी संख्याबळ यापेक्षा अधिक मतांनी जिंकली महाडिक कुटुंबांनी गुलालाची उधळण केली. कोणाला मिळाली किती मते इम्रान प्रतापगडी-44, प्रफुल्ल पटेल -43,संजय राऊत-41, अनिल बोंडे- 48,पियुष गोयल-47, संजय पवार- 33,धनंजय महाडिक-42 महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले की निवडणूक आयोगाने आमचे एक मत अवैद्य ठरवले आहे दोन मतावर आम्ही आक्षेप घेतला होता मात्र कारवाई झाली नाही आयोगाने त्यांची बाजू मांडली.