मंठा येथील दोन तलाठी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात,महसुल विभागाच भ्रष्टाचार चव्हांट्यावर



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
दि.०१ तक्रारदाराच्या वाळू वाहनावर कारवाई न करण्यासाठी दोन तलाठ्यांना 30 हजार रुपयांची लाच फोन पेद्वारे घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले . उमरखेड सज्जाचे अक्षय गणेश भुरेवाल 
( ३५ , रा वैभव कॉलनी , जालना ) व मंगरूळ सज्जाचे मंगेश शंकर लोखंडे ( ३ ९ , रा . शिफा कॉलनी , मंठा ) अशी संशयितांची नाव आहेत तक्रारदार सहा चाकी वाहनांनी वाळू , मुरूम व खडी वाहतूक करतात . २ ९ मे रोजी तक्रारदार हे कोकरसा पाटीजवळून वाळूचे वाहन घेऊन जात होते . तेवढ्यात तलाठी भुरेवाल तलाठी लोखंडे यांनी गाडी अडवून तू पावत्यांमध्ये खाडाखोड केलेली आहे . ती चालणार नाही . तुझ्यावर कारवाई करावी लागेल , असे म्हणून ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली . तडजोडीअंती ३० रूपये ठरवून त्यापैकी ५ हजार रोख घेतले . नंतर ८ हजार रुपये फोन पेद्वारे घेतले . त्यानंतर उर्वरित पैसे उद्या दे असे सांगितले . तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली . मंगळवारी पडताळणी केली असता कारवाई न करण्यासाठी भुरेवाल व लोखंडे यांनी १७ हजार रुपयांची लाच पंचासमक्ष मागणी करून ती फोन पेद्वारे घेतल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली .

दोघे जण ताब्यात 
• लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भुरेवाल यास जालना येथून , तर लोखंडे याला मंठा येथून ताब्यात घेतले . याप्रकरणी रात्री उशिरा दोघांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती . 
■ ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि . एस . एम . मुटेकर , अंमलदार ज्ञानदेव जुंबड , मनोहर खंडागळे शिवाजी जमदाडे , गजानन घायवट , गणेश बुजाडे , कृष्णा देठे , प्रवीण खंदारे यांनी केली आहे .

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....