आदर्श कॉलनी ते शिवाजीनगर रोड चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून काम नव्याने करण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांचे नगरपरिषद परतुर यांना निवेदन सादर.
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आदर्श कॉलनी येथील सिमेंटचे रोडचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये सिमेंट अत्यंत बोगस पद्धतीने वापरून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेले आहे अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत कारण की सिमेंट रस्ता झाल्यानंतर त्यावरून जड वाहनांची वाहतूक पूर्णता झाली असल्यामुळे रोडवरील खडीचे दगड आहे उडून नागरिकांना अपघात झाल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. तसेच सीमेंट रोड हा पूर्णता खीळ खीळ झाला आहे .बोगस सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाचे काम आदर्श कॉलनी रोडचे करण्यात आलेली आहे याची ही वरिष्ठांनी चौकशी केली पाहिजे व तो सिमेंट रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कॉलनीतील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद कार्यालय परतुर यांना देण्यात आलेले आहे. व निवेंदना वरील सह्या
कुंताबाई भुसारे शिवसेना महिला आघाडी परतुर, प्रज्ञा जगताप, प्रियांका जवळकर, गीता भारस्कर ,सुशिलाबाई शिंदे, उर्मिला राऊत, वेणू राऊत, आशा राऊत ,अश्विनी आवटे ,रोशनी खरे, मंडोदरी शिंदे, गौरव डहाळे, संगीता नाचणे ,जयश्री मुजमुले, जिजाबाई मस्के, संजय खरात, गंगाधर शिंदे ,मुक्ता गायकवाड, शंकर डहाळे ,निर्वळ सर, अनिल खरात ,आसाराम म्हस्के, मामा भांजे, दीपक पुरी, अभिषेक राऊत ,प्रथमेश राऊत ,अक्षय खरात, यावेळी यांची उपस्थिती होती.