परतूर नगरपरिषद प्रभाग आरक्षण जाहीर..
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर नगर परिषद प्रभाग आरक्षण उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व मुख्याधिकारी सुधीर गवळी यांनी प्रभागाचे आरक्षण जाहीर केले
काही दिग्गजांची उघडली लॉटरी तर काही दिग्गजांचे स्वप्नभंग परतूर नगर परिषदेच्या अकरा प्रभागांच्या जागेसाठी आज 13 जून सोमवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेकांची लॉटरी लागली .जाहीर झालेली प्रभाग निहाय आरक्षण सोडत कशी.
जागा प्रभाग क्रमांक 1 अ, मध्ये अनुसूचित जाती महिला व ब, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 अ ,मध्ये अनुसूचित जमाती 2 ब, मध्ये सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक 3 अ, सर्वसाधारण (महिला) प्रभाग क्रमांक 3 ब, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 4 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 4 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 अ; मध्ये सर्वसाधारण (महिला) 5 ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 6 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 6 ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 7 अ ,मध्ये सर्वसाधारण (महिला) 7 ब ,सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 8 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 8 ब, सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 9 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) 9ब मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 10 अ, मध्ये सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण महिला 10ब ,सर्वसाधारण (महिला) 10 क मध्ये सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 11 अ, मध्ये अनुसूचित जाती 11 ब, मध्ये सर्वसाधारण (महिला) अशा प्रकारे परतूर नगरपरिषदेची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे.