राज ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त ५४ रक्त दात्यांनी रक्त दान केले- मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके
परतुर प्रतीनीधी हनुमंत दंवडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त,मराठवाडा संपर्क,मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रकाश महाजन,संतोष नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली, लोकमान्य रक्तपेढी संभाजीनगर, मार्फत आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ५४ रक्तदात्यांनी रक्तदान राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवुन रक्तदान केले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिबिराचे आयोजन केले
या रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे उद्घाटक एम.डी. खालापुरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष.डॉक्टर आकात, डॉक्टर नवल ,डॉक्टर तापडीया,डॉक्टर कराड ,डॉक्टर कदम,डॉक्टर भापकर,डॉक्टर सोळंके,डॉक्टर उढान, उपस्थित होते, मनसे अध्यक्ष जालना प्रकाश सोळंके,यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना लोकमान्य ब्लड बँक संभाजीनगर रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन मनसेच्या वतीने पुष्पहार घालून वृक्ष देऊन स्वागत केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाध्यक्ष राम नवल, परतुर तालुका अध्यक्ष कृष्णा सोळंके तालुका अध्यक्ष गणेश बोराडे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर केवारे, शहराध्यक्ष सोपान गोरे,सवाई राम राठोड रंजीत आडे अर्जुन मोहिते भारत शेळके अमित सरकटे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष तुकाराम कदम, मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...