शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी घेतला मध्यान्ह भोजनाचा आनंद...

      
.परतुर प्रतिनिधी : हनुमंत दवंडे 
       परतूर तालुक्यातील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेतला आहे 
      या विषयी सविस्तर वृत असे कि गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे शाळेसह खिचडी बंद असल्याने विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता आला नाही मात्र या वर्षी शासनाने पहिल्या दिवसापासून खिचडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे याचा आनंद आज आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे एक वेगळा अनुभव आज पहायला मिळाला . गेल्या दोन वर्षांत कोरोना मुळे शाळेंत खिचडी शिजलीच नाही शैक्षणिक नुकसान तर झालेच शिवाय सहभोजनाचा आनंद मिळत नव्हता तो आनंद आज पहायला मिळाला .या बाबत बोलताना विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनीसांगितले की शाळेच्या पहिल्या दिवसापासून खिचडी सुरू केल्याने मुले आनंदाने शाळेत येतील व दोन वर्षांपासून झालेले शैक्षणिक नुकसान ही भरून काढतील .या वेळी शाळेचे सहशिक्षक आबासाहेब गाडेकर , भास्कर कुलकर्णी, चत्रभुज खवल, पांडुरंग डवरे, गणेश वखरे, मदतनीस संगिता ताई करपे यांच्यासह अनेक जन उपस्थित होते .

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....