परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.
प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर येथे वंचित बहुजन आघाडी ची बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महासचिव रवींद्र भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली परतुर तालुक्यातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती, व नगर परिषद येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली
.यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात जिल्हा सचिव राहुल नाटकर जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, बाबू गोसावी वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष, अच्युत पाईकराव तालुका महासचिव, रविंद्र भदर्गे तालुका उपाध्यक्ष ,शोएब पठाण कोषाध्यक्ष ,रतन शिरसाठ, प्रकाश मस्के ,जमीर शेख, सिद्धार्थ पाणवाले ,कृष्णा पाईकराव, मनोज वंजारे आदींची उपस्थिती या बैठकीला होती.