मंठा येथील माता भगवती गोशाळा शासकीय अनुदानाच्या प्रतीक्षेत


 मंठा प्रतीनीधी सुभाष वायाळ
     दि.०१महाराष्ट्रात जनावरे व पशुपालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीला पूरक असणारा दुग्ध व्यवसाय ही काही जण करत असतात. यातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती तर होतेच त्याबरोबरच शेती कसण्यासाठी लागणारे बैल ही उपलब्ध होतात.
          परंतु सध्या शेतीमध्ये होत चाललेल्या आधुनिकीकरणामुळे, मनुष्यबळाच्या अभावामुळे, शासनाचे पशुपालका विषयी असणारे उदासीन धोरण अशा अनेक समस्यांमुळे जनावरे व पशुपालकांची संख्या कमी होऊन ग्रामीण भागातून हि गोठ्यातील गाय नाहीशी झाली आहे. अशा कठीण परिस्थितीतही गो पालणाचे काम मंठा शहरात रेणुका देवी परिसरामध्ये दोन ध्येयवेड्या तरुणाने महेश सराफ व संतोष तिवारी यांनी शासनाची कुठलीही मदतीची अपेक्षा न ठेवता गेल्या दहा वर्षांपासून स्वखर्चाने माता भगवती गोशाळा अवघ्या पाच गाईपासून सुरवात केली. आज घडीला जवळपास 125 गाई आहेत. काही गाई पाळणारे व्यक्ती आजारी, अपंगत्व आलेल्या, म्हाताऱ्या गाई, या गो शाळेमध्ये हक्काने आणून घालतात.शहरातील व परिसरातील काही दानशूर व्यक्ती सामाजिक जाणीवेतून आर्थिक हातभार लावतात परंतु सध्याची चाऱ्याची कमतरता,त्यांची वाढती किंमत व पाण्याची कायमची सोय करणे, व देखरेखी साठी मनुष्य बळा ची आवश्यकता, गाईना कायमस्वरूपी निवांऱ्याची गरज,वैद्यकीय उपचार,अशा अनेक समस्यामुळे मिळत असलेली मदत हि कमी पडत असून शासनानी व सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत करून हातभार लावावा.अशी मागणी माता भगवती गोशाळेच्या वतीने करण्यात येत आहे.


 चौकट
 माता भगवती गोशाळेचा माध्यमातून शासनाला वेळोवेळी मदतीची मागणी करून पाठपुरावा केला परंतु त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा खंत महेश सराफ व संतोष तिवारी यांनी व्यक्त केला.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात