नदीवर तात्काळ पुल बांधा' अन्यथा पाण्यात आंदोलन
सिंदखेडराजा प्रतीनीधी समधान खरात
सिंदखेडराजा तालुक्यातील दरेगाव नदीवर पुल नसल्यामुळे गावकर्यांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन वाट काढावी लागते आहे. याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राधेशाम बंगाळे यांनी केला आहे. जोराचा पाऊस आल्यावर रस्त्यासाठी नागरिकांची तारांबळ ऊडत आसुन बुलढाणा जिल्हा परीषद च्या बांधकाम विभागाने लक्ष घालणं गरजेचं आसल्याचे मनसेचे राधेश्याम बंगाळे यांनी म्हंटले आहे. लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभागाने दुर्लक्ष करता कामा नये. तात्काळ हा पुल बांधावा नसता पाण्यात ऊतरुनच आंदोलन करु आसा ईशारा राधेश्याम बंगाळे यांनी दिला आहे. पुल मंजुर झाला आहे का? किंवा या पुलाचे पैसे अधिकारी व गुत्तेदारांनी तर ऊचलन खाल्ले नाही ना? आसा सवालहि बंगाळे यांनी केला आहे.